- इंदापूर प्रतिनिधी:=
- इंदापूर तालुक्याचे विकासरत्न कृषी मंत्री दत्तात्रय भरणे मामा यांच्या वाढदिवसानिमित्त कळंब तालुका इंदापूर येथील कळंब विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या इमारतीमध्ये भव्य रक्तदान शिबिर सोहळारविवार दिनांक ७ जून रोजी सकाळी ९:०० ते संध्याकाळी ६:०० वाजेपर्यंत असणार आहे असे आयोजक योगेश भैया डोंबाळे पाटील यांच्या वतीने माहिती दिली आहे.
- रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे रक्तदान केल्याने अनेकांचा जीव वाचू शकतो यासाठी योगेश भैय्या डोंबाळे पाटील यांच्या वतीने दरवर्षी कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर भरवण्यात येते यावेळी शेकडो लोक सहभागी घेतात रक्तदात्यांना सर्टिफिकेट सोबत गिफ्ट देखील दिले जाते.
- भव्य रक्तदान सोहळ्याच्या आयोजन योगेश भैया डोंबाळे पाटील यांनी सांगितले की” या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषद सदस्य प्रताप पाटील, छत्रपती साखर कारखान्याचे विद्यमान चेअरमन पृथ्वीराज बापू जाचक, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते शशिकांत तरंगे, जिल्हा परिषद सदस्य निर्मला सागर मिसाळ ,सहाय्यक पोलीस निरीक्षक राजकुमार डोनगे, इंदापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष हनुमंत कोकाटे ,राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष शुभम निंबाळकर, छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन अमोल पाटील, इंदापूर पंचायत समितीचे सभापती हर्षवर्धन लोंढे, जिल्हा नियोजन समिती सदस्य सचिन सपकाळ ,पंचायत समिती सदस्य अनिता सोनवणे व बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक शुभम भैय्या ठोंबरे आदी मान्यवर असून
- प्रमुख उपस्थिती माजी पंचायत समिती सदस्य सुहास डोंबाळे ,कृषी उत्पन्न बाजार समिती इंदापूरचे माजी सभापती दत्तात्रय आबा फडतरे, वालचंद विद्यालयाचे अध्यक्ष रामचंद्र कदम ,उपाध्यक्ष मधुकर पाटील, कळंब विविध सहकारी सोसायटीचे चेअरमन आप्पासाहेब अर्जुन व्हाइस चेअरमन दत्तात्रय जानकर ,अल्पसंख्यांक विभागाचे इंदापूर तालुका अध्यक्ष इकबाल शेख.त्याचप्रमाणे कळंब गावच्या सरपंच विद्याताई अतुल सावंत, उपसरपंच लक्ष्मण पालवे ,सदस्य राजेंद्र डोंबाळे ,संदीप डोंबाळे ,माऊली मिटकरी, प्रमोद खंडागळे, सागर कोळी, गणेश चव्हाण. यांसह वालचंदनगर रणगांव चिखली कळंब परिसरातील शेकडो युवक सहभागी होणार असल्याची माहिती योगेश भैया डोंबाळे पाटील यांनी दिली.
Trending
- रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे:=पंचायत समिती सदस्य श्रीराज भरणे यांचे मत
- कृषिमंत्र्याच्या राज्यात बळीराजा अंधारात
- डिजिटल तंत्रज्ञानातून व्यावसायिक प्रगती साधने ही काळाची गरज:=करण देवकर व शिवानी देवकर यांचे मत
- डिजिटल तंत्रज्ञानातून व्यवसायात प्रगती साधणे ही काळाची गरज :=करण आणि शिवानी देवकर यांचे मत
- वालचंदनगर येथील फळ विक्रेत्याचा मुलगा झाला सीए अर्थात चार्टर्ड अकाउंटंट
- कळंब गावच्या मातीत रंगणार आंतरराष्ट्रीय व्यवस्थापन चर्चासत्र 16 देश सहभागी होणार
- भारतीय क्रिकेट खेळाडूंवर ईडीची जप्ती ११ कोटीची मालमत्ता जप्त
- वृद्ध महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरास वालचंदनगर पोलिसांनी केली अटक


