इंदापूर प्रतिनिधी :-
इंदापूर तालुक्यातील मूकबधिर कर्णबधिर विद्यार्थ्यांची तपासणी करून त्यांना लवकरच शासनाच्या वतीने व भारत केअर्सच्या माध्यमातून मोफत श्रवण यंत्र देण्यात येणारा आहेत. दिव्यांग विद्यार्थ्यांमध्ये नैसर्गिक शक्ती अधिक असल्याने ते कोणत्याही परिस्थितीला न डगमगता सामोरे जातात व यशाला गवसणी घालतात असे मत इंदापूर तालुका गट शिक्षणाधिकारी पांडुरंग कोळेकर यांनी व्यक्त केले.मावेशित शिक्षणाच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण आणि संवेदनशील पाऊल!* कर्णबधिर विद्यार्थ्यांसाठी मोफत श्रवण तपासणी व ऑडिओमेट्री शिबिर यशस्वी!*
*जिल्हा परिषद पुणे आणि ‘भारत केअर्स’* यांच्या संयुक्त विद्यमाने पंचायत समिती इंदापूर च्या (समावेशित शिक्षण विभाग) माध्यमातून तालुक्यातील कर्णबधिर विद्यार्थ्यांसाठी नुकतेच एक विशेष शिबिर पार पडले.
शिबिराची ठळक वैशिष्ट्ये:
🔹 *तालुक्यातील 67 विद्यार्थ्यांची मोफत श्रवणक्षमता व ऑडिओमेट्री चाचणी पूर्ण.*
🔹 आवश्यकतेनुसार मोफत श्रवणयंत्रासाठी विद्यार्थ्यांची यशस्वी निवड.
पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांच्या संकल्पनेतून, शिक्षणाधिकारी .ललिता दहीतुले आणि पंचायत समिती इंदापूरचे उपक्रमशील गटशिक्षणाधिकारी. पांडुरंग कोळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली* हा स्तुत्य उपक्रम राबविण्यात आला.
अक्षय शितोळे यांचे संयोजन आणि सर्व केंद्रस्तरीय विशेष शिक्षक व विषय तज्ज्ञ बशीर सय्यद , माधुरी भोसले , ज्ञानेश्वर साळुंखे , सुधाकर पाटील, शंकर सावंत, किशोर कानगुडे , मनीषा पाटील , यांच्या अथक परिश्रमातून हा उपक्रम यशस्वी झाला. सर्वांचे मनःपूर्वक अभिनंदन! 👏
*“श्रवणयंत्रातून श्रवण, श्रवणातून संवाद, संवादातून शिक्षण आणि शिक्षणातून सक्षमीकरण!”*🌸💐


