डिजिटल क्रिएटिव्हिटीला नवे व्यासपीठ : graphicswale.com
इंदापूर प्रतिनिधी:=
बदलत्या काळानुसार आजच्या पिढीने नव्याचा अंगीकार करणे गरजेचे आहे त्यांनुसार समाजातील विविध कार्यक्रमांसाठी आकर्षक डिझाईन तयार करण्याची गरज दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे डिजिटल तंत्रज्ञान या पार्श्वभूमीवर GraphicsWale हा नवा डिजिटल प्लॅटफॉर्म सुरू करण्यात आला असल्याची माहिती इंदापूर येथील ग्रामीण भागातील करण देवकर आणि शिवानी देवकर यांनी दिली आहे.या वेबसाइटवर आकर्षक अशी लग्नाचे निमंत्रण, श्रद्धांजली पोस्टर, उद्घाटन समारंभ, वाढदिवस, जयंती, सत्यनारायण पूजा, वास्तुशांती आदी विविध कार्यक्रमांसाठी रेडीमेड डिझाईन टेम्पलेट्स उपलब्ध करण्यात आली असून वापरकर्ते मोबाईल किंवा संगणकाच्या माध्यमातून काही मिनिटांत आकर्षक डिझाईन तयार करून डाउनलोड करू शकतात.
या प्लॅटफॉर्मची निर्मिती करण विष्णू देवकर (रा. कळाशी , ता. इंदापूर, जि. पुणे) आणि शिवानी विष्णू देवकर यांनी केली आहे. ग्रामीण भागातील लोकांनाही सहजपणे डिजिटल डिझाईन तयार करता यावे, या उद्देशाने हा उपक्रम सुरू केल्याचे संस्थापकांनी सांगितले.
आजच्या युवा पिढीला ही डिजिटल कला माहीत असणे आवश्यक आहे.भविष्यात या प्लॅटफॉर्मवर आणखी विविध प्रकारचे डिझाईन आणि सुविधा उपलब्ध करून देत पुणे जिल्ह्यात अग्रेसर डिजिटल तंत्रज्ञान अवलंबित करून रोजगार निर्मिती करण्याचा मानसही करण देवकर आणि शिवानी देवकर यांनी व्यक्त केला आहे.
फोटो :=कळाशी (ता. इंदापूर) येथील ग्रामीण भागातील युवकांनी डिजिटल तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी नाविन्यपूर्ण उपक्रम राबविला .



