Close Menu
Nirbhid MaharashtraNirbhid Maharashtra
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • कळंब गावच्या मातीत रंगणार आंतरराष्ट्रीय व्यवस्थापन चर्चासत्र 16 देश सहभागी होणार
    • भारतीय क्रिकेट खेळाडूंवर ईडीची जप्ती ११ कोटीची मालमत्ता जप्त
    • वृद्ध महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरास वालचंदनगर पोलिसांनी केली अटक
    • भारत चिल्ड्रेन्स अकॅडमी मधील खेळाडूंनी कांस्यपदक पटकावले
    • कळंब येथील रस्ता गेला खड्ड्यात.. प्रवासी वर्गात नाराजीचा सूर..
    • Hello world!
    Facebook X (Twitter) Instagram
    Nirbhid MaharashtraNirbhid Maharashtra
    Demo
    Nirbhid MaharashtraNirbhid Maharashtra
    Home»ताज्या बातम्या»कळंब येथील रस्ता गेला खड्ड्यात.. प्रवासी वर्गात नाराजीचा सूर..
    ताज्या बातम्या

    कळंब येथील रस्ता गेला खड्ड्यात.. प्रवासी वर्गात नाराजीचा सूर..

    संपादक तात्यासाहेब घाटेBy संपादक तात्यासाहेब घाटेOctober 27, 2025No Comments5 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
    इंदापूर तालुक्याच्या पश्चिम भागातील सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या कळंब गावातील गार्डन चौक ते लालपुरी या १२०० मीटर अंतराच्या रस्त्यासाठी कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आमदार निधीतून एक कोटी तीस लाख रुपयांचा निधी मंजूर केला. मात्र तयार झालेला रस्ता तीन महिन्यातच उघडल्याने व रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडल्याने उद्घाटन करण्यापूर्वीच शासनाचा निधी पाण्यात गेला की काय अशी भावना शेतकरी वर्गातून व्यक्त होत आहे.
    कळंब येथील शेतकरी सोमनाथ पवार यांच्या घरालगत गार्डन चौक ते लालपुरी हा १२०० मीटरचा रस्ता आहे त्यामध्ये ४०० मीटर रस्त्याचे कॉंक्रिटीकरण करण्यात आले व ८०० मीटर रस्त्याचे डांबरीकरण झाले खरे.
    मात्र या डांबरीकरण केलेल्या रस्त्यामध्ये अनेक ठिकाणी रस्ता खचलेला आहे.
     खड्डे पडलेले आहेत .
    अजून केलेल्या रस्त्याचे उद्घाटन देखील झालेल्या नाही
     शासन रस्त्याच्या विकास कामांसाठी कोट्यावधी रुपये निधी देते.
     कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी गाव विकासासाठी कोट्यावधी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिलेला असताना केवळ ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांच्या डोळे झाकपणामुळे रस्त्याची अक्षरशः वाट लागलेली आहे .
    याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाचे भिगवण येथील अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांनी भ्रमणध्वनी उचलला नाही.
    गार्डन चौक येथे अनेक वैद्यकीय सुविधा असलेली हॉस्पिटल्स आहेत तर लालपुरी येथे हजारो लोकवस्ती असलेले नगर आहे.
     या रस्त्याच्या मध्ये आंबेडकर कॉलनी येथे अनेक नागरिक राहत आहेत त्यामुळे हा रस्ता अत्यंत महत्त्वाचा आहे .
    आजारी रुग्णांना घेऊन जाण्यासाठी हा रस्ता महत्त्वाचा असल्याने कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी परिस्थिती लक्षात घेऊन कोट्यावधी रुपयांचा निधी मंजूर केला होता .
    मात्र निष्कृष्ट दर्जाच्या कामामुळे हा निधी अक्षरशः पाण्यात गेला असल्याचे मत स्थानिक नागरिकांमधून व्यक्त होत आहे.
    फोटो ओळी:= कळंब येथील गार्डन चौक ते लालपुरी या एक कोटी तीस लाख रुपये खर्चून तयार केलेला रस्ता उद्घाटनापूर्वीच खराब झाला.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    संपादक तात्यासाहेब घाटे

    Related Posts

    कळंब गावच्या मातीत रंगणार आंतरराष्ट्रीय व्यवस्थापन चर्चासत्र 16 देश सहभागी होणार

    February 4, 2026

    भारतीय क्रिकेट खेळाडूंवर ईडीची जप्ती ११ कोटीची मालमत्ता जप्त

    November 7, 2025

    भारत चिल्ड्रेन्स अकॅडमी मधील खेळाडूंनी कांस्यपदक पटकावले

    October 28, 2025
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.