इंदापूर प्रतिनिधी:= इंदापूर तालुक्याच्या पश्चिम भागातील काझड येथील वयोवृद्ध महिलेच्या गळ्यातील दागिने हिसकावून चोरणाऱ्या दोन जणांना पोलिसांनी अटक केली असल्याची माहिती वालचंदनगर पोलिसांनी दिली आहे. वालचंदनगर पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मौजे काझड (तालुका इंदापूर )येथील सिंधू काशिनाथ नरोटे वय ६० वर्ष या आपल्या राहत्या घराजवळील आर्या जनरल स्टोअर्समध्ये सामान खरेदीसाठी गेल्या असता त्यांच्यावर पाळत ठेवणाऱ्या युवकांनी दुचाकीवरून येऊन त्यांच्या गळ्यातील दागिने हिसकावून चोरून युनिकॉर्न या दुचाकीवरून पळून गेले. वालचंदनगर पोलिसांनी याबाबत भवानीनगर, काझड, बोरी ,लाकडी, निंबोडी व बारामती तालुक्यातील रुई ,सावळ ,काटेवाडी कन्हेरी आदि गावातील किमान १००हून अधिक सीसी टीव्ही फुटेज तपासणी केली असता फिर्यादी व साक्षीदार आणि गुणवडी येथील…
Author: संपादक तात्यासाहेब घाटे
इंदापूर प्रतिनिधी:= “देशाच्या प्रगतीत खेळाला अनन्य साधारण महत्त्व प्राप्त झाले असून विद्यार्थ्यांनी शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्यासोबत आपल्यातील अंगभूत खेळाला वाव देत योग्य मार्गदर्शन व यशस्वी होण्यासाठी सराव केल्यास खेळाच्या माध्यमातून देशाचा नावलौकिक वाढेल “असे मत बीसीए चे प्राचार्य कृष्णदेव शिरसागर यांनी व्यक्त केले. भारत चिल्ड्रन्स अकॅडमी अँड ज्युनियर कॉलेज, वालचंदनगर मधील विद्यार्थी इंद्रजीत रणवरे याने अलिबाग येथे नुकत्याच पार पडलेल्या महाराष्ट्र राज्यस्तरीय बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धा २०२५ मध्ये उल्लेखनीय कामगिरी करत कांस्य पदक पटकावले आहे. या यशामध्ये मार्गदर्शक कोच व प्राचार्य कृष्णदेव क्षीरसागर यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली इंद्रजीतने शिस्तबद्ध सराव करून राज्यस्तरावर आपले कौशल्य सिद्ध केले. इंद्रजीत रणवरे यांच्या यशाबद्दल …
इंदापूर तालुक्याच्या पश्चिम भागातील सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या कळंब गावातील गार्डन चौक ते लालपुरी या १२०० मीटर अंतराच्या रस्त्यासाठी कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आमदार निधीतून एक कोटी तीस लाख रुपयांचा निधी मंजूर केला. मात्र तयार झालेला रस्ता तीन महिन्यातच उघडल्याने व रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडल्याने उद्घाटन करण्यापूर्वीच शासनाचा निधी पाण्यात गेला की काय अशी भावना शेतकरी वर्गातून व्यक्त होत आहे. कळंब येथील शेतकरी सोमनाथ पवार यांच्या घरालगत गार्डन चौक ते लालपुरी हा १२०० मीटरचा रस्ता आहे त्यामध्ये ४०० मीटर रस्त्याचे कॉंक्रिटीकरण करण्यात आले व ८०० मीटर रस्त्याचे डांबरीकरण झाले खरे. मात्र या डांबरीकरण केलेल्या रस्त्यामध्ये अनेक ठिकाणी रस्ता खचलेला आहे. खड्डे…

