इंदापूर प्रतिनिधी:=
इंदापूर तालुक्याच्या पश्चिम भागातील काझड येथील वयोवृद्ध महिलेच्या गळ्यातील दागिने हिसकावून चोरणाऱ्या दोन जणांना पोलिसांनी अटक केली असल्याची माहिती वालचंदनगर पोलिसांनी दिली आहे.
वालचंदनगर पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मौजे काझड (तालुका इंदापूर )येथील सिंधू काशिनाथ नरोटे वय ६० वर्ष या आपल्या राहत्या घराजवळील आर्या जनरल स्टोअर्समध्ये सामान खरेदीसाठी गेल्या असता त्यांच्यावर पाळत ठेवणाऱ्या युवकांनी दुचाकीवरून येऊन त्यांच्या गळ्यातील दागिने हिसकावून चोरून युनिकॉर्न या दुचाकीवरून पळून गेले.
वालचंदनगर पोलिसांनी याबाबत भवानीनगर, काझड, बोरी ,लाकडी, निंबोडी व बारामती तालुक्यातील रुई ,सावळ ,काटेवाडी कन्हेरी आदि गावातील किमान १००हून अधिक सीसी टीव्ही फुटेज तपासणी केली असता फिर्यादी व साक्षीदार आणि गुणवडी येथील एका युवकाबाबत साम्य आढळून आले.
वालचंद नगर पोलिसांनी रोहित विजय बोरकर वय २१ वर्षे राहणार गुणवडी( तालुका बारामती) याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने रोहित उर्फ कोच्या दीपक कुदळे वय वीस वर्ष राहणार बांदलवाडी या दोघांनी संगणमताने महिलेच्या गळ्यातील सोने हिसकावून पळून गेलेची कबुली दिली आहे.
अशी माहिती वालचंदनगर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक मिलिंद, मिठापल्ली यांनी सांगितले.
या प्रकरणी बारामती उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सुदर्शन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली वालचंद नगर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजकुमार डूणगे गुलाबराव पाटील, शैलेश स्वामी ,जगदीश चौधरी सतीश फुलारे गणेश वानकर रणजीत देवकर अभिजीत कळसकर यांनी सहकार्य केले आहे .
फोटो ओळी :=काझड येथील वृद्ध महिलेच्या गळ्यातील सोन्याचे दागिने हिसकावून घेणाऱ्या दोन जणांना वालचंद नगर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.


