- इंदापूर प्रतिनिधी:=
“देशाच्या प्रगतीत खेळाला अनन्य साधारण महत्त्व प्राप्त झाले असून विद्यार्थ्यांनी शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्यासोबत आपल्यातील अंगभूत खेळाला वाव देत योग्य मार्गदर्शन व यशस्वी होण्यासाठी सराव केल्यास खेळाच्या माध्यमातून देशाचा नावलौकिक वाढेल “असे मत बीसीए चे प्राचार्य कृष्णदेव शिरसागर यांनी व्यक्त केले.
भारत चिल्ड्रन्स अकॅडमी अँड ज्युनियर कॉलेज, वालचंदनगर मधील विद्यार्थी इंद्रजीत रणवरे याने अलिबाग येथे नुकत्याच पार पडलेल्या महाराष्ट्र राज्यस्तरीय बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धा २०२५ मध्ये उल्लेखनीय कामगिरी करत कांस्य पदक पटकावले आहे.
या यशामध्ये मार्गदर्शक कोच व प्राचार्य कृष्णदेव क्षीरसागर यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.
त्यांच्या मार्गदर्शनाखाली इंद्रजीतने शिस्तबद्ध सराव करून राज्यस्तरावर आपले कौशल्य सिद्ध केले.
इंद्रजीत रणवरे यांच्या यशाबद्दल
प्राचार्य कृष्णदेव क्षीरसागर यांनी सांगितले की, “इंद्रजीत हा मेहनती व जिद्दी विद्यार्थी असून, योग्य मार्गदर्शन व नियमित सरावाच्या बळावर त्याने हे यश संपादन केले आहे. भविष्यात राष्ट्रीय स्तरावरदेखील तो उत्तम कामगिरी करेल, असा मला विश्वास आहे.
वालचंदनगर इंडस्ट्रीज लिमिटेड चे
व्यवस्थापकीय संचालक व कार्यकारी अधिकारी श्री. चिराग दोशी, फॅक्टरी मॅनेजर राजन अध्यक्ष, मनुष्यबळ विभाग प्रमुख केळकर, जनरल मॅनेजर विनायक बुधावंत तसेच शाळा समितीचे अध्यक्ष पंकज पवार व उपाध्यक्ष गणेश डोंबाळे क्रीडा शिक्षक अमोल गोडसे,ज्ञानेश्वर जगताप, आशा रणवरे यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
निमसाखर येथील रहिवासी असलेल्या इंद्रजीत रणवरेच्या या कामगिरीमुळे केवळ त्याच्या कुटुंब शाळा व तालुक्याचे नाव उंचावले आहे.
फोटो ओळी:=वालचंद नगर येथील भारत चिल्ड्रन्स अकॅडमी या शाळेतील इंद्रजीत रणवरे या विद्यार्थ्याने बॉक्सिंग खेळामध्ये राज्यस्तरीय पदक पटकावले आहे.


