पुणे प्रतिनिधी
भारतामध्ये सर्वाधिक पसंती असलेल्या क्रिकेट खेळातील दोन दिग्गज खेळाडूंवर ईडीने जप्ती आणीत ११कोटी १४ लाखाची मालमत्ता जप्त केली आहे.
भारतीय क्रिकेट संघातील नावलौकिक मिळवलेल्या व फलंदाजी आणि क्षेत्ररक्षणात कर्तबगार असलेल्या सुरेश रैना व शिखर धवन या दोन खेळाडूंवर मनी लॉन्ड्री प्रकरणी जप्ती आणली असून त्यांनी टाकलेल्या दाढीमध्ये सुरेश रैना यांची ६ कोटी ६४ लाख तर शिखर धवन यांची ४ कोटी ५० लाख रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे
याबाबत सविस्तर माहिती अशी 1x Bet व त्यांच्याशी संबंधित असलेल्या जाहिरात प्लॅटफॉर्म असलेल्या कंपन्यावर भारतात बंदी असताना या कंपन्यांची जाहिरात केल्याप्रकरणी सुरेश रैना व शिखर धवन या दोन क्रिकेटपटूनवर फसवणूक व कर चुकवेगिरी बाबत तसेच ऑनलाईन बॅटिंग आणि जुगार आदीचा ठपका ईडीने या दोन खेळाडूंवर ठेवलेला आहे ज्या कंपन्यांवर आणि ॲपवर भारतात बंदी आहे त्या कंपनीच्या. 1x Bet सारख्या,fair plan,pari march, Lotus 365 ॲपच्या माध्यमातून कर चुकवेगिरी केली जाते यामुळे देशाचे नुकसान होत आहे अशा ॲपवर बंदी असताना या दोन खेळाडूंनी मॅच्युअल फंड व स्थावर मालमत्ता याबाबत कर चुकवेगिरीचा ठपका ईडीने ठेवलेला आहे यापूर्वीही ऑनलाइन बेटिंग आणि जुगार या प्रकरणी मिमी चक्रवर्ती रॉबिन उथप्पा आदींना चौकशीसाठी सामोरे जावे लागले आहे
भारतात कोठेवधी क्रिकेटचे चाहते आहेत या क्रिकेटच्या त्यांना व देशातील नागरिकांना क्रिकेटर सुरेश रैना अवश्यकर धवन यांच्यावर मनी प्रकरणी ११ कोटीहून अधिक रुपयांची मालमत्ता जप्ती झाल्याने अनेकांना आश्चर्याचा धक्का बसलेला आहे


