इंदापूर तालुक्याच्या पश्चिम भागातील सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या कळंब गावातील गार्डन चौक ते लालपुरी या १२०० मीटर अंतराच्या रस्त्यासाठी कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आमदार निधीतून एक कोटी तीस लाख रुपयांचा निधी मंजूर केला. मात्र तयार झालेला रस्ता तीन महिन्यातच उघडल्याने व रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडल्याने उद्घाटन करण्यापूर्वीच शासनाचा निधी पाण्यात गेला की काय अशी भावना शेतकरी वर्गातून व्यक्त होत आहे.
कळंब येथील शेतकरी सोमनाथ पवार यांच्या घरालगत गार्डन चौक ते लालपुरी हा १२०० मीटरचा रस्ता आहे त्यामध्ये ४०० मीटर रस्त्याचे कॉंक्रिटीकरण करण्यात आले व ८०० मीटर रस्त्याचे डांबरीकरण झाले खरे.
मात्र या डांबरीकरण केलेल्या रस्त्यामध्ये अनेक ठिकाणी रस्ता खचलेला आहे.
खड्डे पडलेले आहेत .
अजून केलेल्या रस्त्याचे उद्घाटन देखील झालेल्या नाही
शासन रस्त्याच्या विकास कामांसाठी कोट्यावधी रुपये निधी देते.
कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी गाव विकासासाठी कोट्यावधी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिलेला असताना केवळ ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांच्या डोळे झाकपणामुळे रस्त्याची अक्षरशः वाट लागलेली आहे .
याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाचे भिगवण येथील अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांनी भ्रमणध्वनी उचलला नाही.
गार्डन चौक येथे अनेक वैद्यकीय सुविधा असलेली हॉस्पिटल्स आहेत तर लालपुरी येथे हजारो लोकवस्ती असलेले नगर आहे.
या रस्त्याच्या मध्ये आंबेडकर कॉलनी येथे अनेक नागरिक राहत आहेत त्यामुळे हा रस्ता अत्यंत महत्त्वाचा आहे .
आजारी रुग्णांना घेऊन जाण्यासाठी हा रस्ता महत्त्वाचा असल्याने कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी परिस्थिती लक्षात घेऊन कोट्यावधी रुपयांचा निधी मंजूर केला होता .
मात्र निष्कृष्ट दर्जाच्या कामामुळे हा निधी अक्षरशः पाण्यात गेला असल्याचे मत स्थानिक नागरिकांमधून व्यक्त होत आहे.
फोटो ओळी:= कळंब येथील गार्डन चौक ते लालपुरी या एक कोटी तीस लाख रुपये खर्चून तयार केलेला रस्ता उद्घाटनापूर्वीच खराब झाला.


