”
निर्भीड न्यूज प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य
महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच ग्रामीण भागात आंतरराष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन केले असून या चर्चासत्रामध्ये १६ देश सहभागी होणार असून ८०० हून अधिक विद्यार्थी संवाद साधणार असल्याची माहिती फडतरे नॉलेज सिटीचे अध्यक्ष उत्तम फडतरे यांनी दिली.
पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्याच्या पश्चिम भागातील कळंब येथील फडतरे नॉलेज सिटी मध्ये ६ आणि ७ फेब्रुवारी या दिवशी फार्मसी अभियांत्रिकी आणि व्यवस्थापन या प्रगतीच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या विषयावर चर्चासत्र होणार आहे .
या आंतरराष्ट्रीय परिषदेच्या माध्यमातून ग्रामीण भागात शैक्षणिक विकासात लाखमोलाचे योगदान देत असून यामध्ये इंदापूर तालुक्यातील फडतरे नॉलेज सिटी कळंब वालचंदनगर युनिव्हर्सिटी न्यू जर्सी यूएसए आणि आफ्रिका एशिया स्कॉलर्स ग्लोबल नेटवर्क लंडन यांच्या समन्वयातून फार्मसी अभियांत्रिकी आणि व्यवस्थापन या महत्त्वपूर्ण विषयावर आंतरराष्ट्रीय शिखर परिषद होत आहे.
कळंब गावच्या मातीत ऐतिहासिक आंतरराष्ट्रीय चर्चासत्र होणार असून फार्मासिस्ट इंजीनियरिंग आणि मॅनेजमेंट सायन्स वरील ही पहिलीच शिखर परिषदेची कल्पना बहुविद्या शासकीय जागतिक व्यासपीठाच्या स्वरूपात होणार असून यामध्ये व्यावसायिक शिक्षण आणि त्याच्या माध्यमातून व्यवहारात भविष्याला आकार येणाऱ्या नवनवीन फॅक्ट्स व नाविन्यपूर्ण उपक्रम रोजगार निर्मिती व शैक्षणिक क्षेत्रात बहुमूल्य प्रगती आदी विषयावर चर्चा होणार आहे.
विविध क्षेत्रातील शिक्षण तज्ञ, संशोधक, यशस्वी उद्योजक, प्रगतशील व्यावसायिक, उच्च धोरण कर्ते आणि शैक्षणिक क्षेत्रात नेत्रदीपक कामगिरी करणाऱ्या ८०० हून अधिक विद्यार्थ्यांचा सहभाग असणार आहे.
ज्यामुळे जागतिक दृष्टिकोन मजबूत करण्यास शैक्षणिक आणि औद्योगिक संबंध प्रस्थापित करणे ही काळाची गरज आहे.
व त्याच्या सक्षमीकरणासाठी या परिषदेत जागतिक सामाजिक आणि औद्योगिक गरजा पूर्ण करण्यासाठी फार्मासिस्ट अभियांत्रिकी आणि सायन्स मॅनेजमेंट वेगवेगळ्या स्वरूपाने विकसित करीत औद्योगिक क्षेत्रात परिवर्तनाची नांदी होणार असल्याची माहिती उत्तम फडतरे यांनी दिली.
ते पुढे म्हणाले की औद्योगिक परिवर्तन आणि व्यवसाय या परिसंस्थाच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी आवश्यक असलेली शैक्षणिक धोरणे तंत्रज्ञान व विविध कौशल्य संचाचा रिसर्च करण्याचा व त्यातून विद्यार्थ्यांची औद्योगीकरणाची पर्यायाने देशाची प्रगती कशा पद्धतीने साधता येईल.
यासाठी ही परिषद अत्यंत लाखमोलाची असल्याची माहिती संस्थाध्यक्ष फडतरे यांनी दिली.
फोटो ओळी:= कळंब तालुका इंदापूर येथील याच फडतरे नॉलेज सिटी मध्ये आंतरराष्ट्रीय परिसंवाद होणार असून यामध्ये १६ देश सहभागी होणार आहेत.


